Ad will apear here
Next
लेखक, कवी, नाटककार राम गणेश गडकरी यांचा जन्मदिन

जन्म. २६ मे १८८५
गडकरी यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी  'किर्लोस्कर नाटक मंडळी'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरीभाऊ आपट्यांच्या 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. 

कविता व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले. गडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला सारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. 

मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकऱ्यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकऱ्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे. 

गडकऱ्यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम ह्या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. नाट्यछटेपासून ते संवाद आणि विडंबनापर्यंत विविध प्रकारांतून गडकऱ्यांनी विनोद हाताळला. संपूर्ण बाळकरामचे पानन्‌पान खरोखरीच उच्च अभिरुचीच्या हास्यरसाची निर्मिती करणारे आहे.

 राम गणेश गडकऱ्यांनी  'मासिक मनोरंजन' मध्ये 'बाळकराम' ह्या टोपण नावाने विपुल लेखन केले. पुढे त्यांतील काही लेखांचा संग्रह 'रिकामपणची कामगिरी' ह्या नावाच्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. मा.राम गणेश गडकरी यांचे २३ जानेवारी १९१९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा. राम गणेश गडकरी यांना आदरांजली.

संजीव_वेलणकर  
संगीत एकच प्याला हे पुस्तक बुकगंगा डॉट कॉम वरून २५% सवलतीत घरपोच मागवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा 8888 300 300 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GTFDCY
Similar Posts
चित्रकार, लेखक, कवी सुभाष त्र्यंबक अवचट यांचा वाढदिवस. आज चित्रकार, लेखक, कवी सुभाष त्र्यंबक अवचट यांचा वाढदिवस. जन्म.१२ एप्रिल १९४९ ओतूर.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी, गोविंद विनायक तथा विं दा करंदीकर यांचा जन्मदिन जन्म. २३ ऑगस्ट १९१८ रत्नागिरी जिल्यातील घालवली येथे. ‘देणार्यानने देत जावे, घेणार्यााने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणार्या,चे हात घ्यावे,
लेखक, संगीतकार व दंतचिकित्सक डॉ. आशुतोष जावडेकर यांचा वाढदिवस जन्म. ५ जून १९७९ पुणे येथे. प्रख्यात लेखक, कवी, गायक आणि संगीतकार असं हरहुन्नरी व्यक्तिमत्व अर्थात डाॅ. आशुतोष जावडेकर हे पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातले दंतचिकित्सक म्हणून काम करतात.बीडीएस ची पदवी संपादन करून वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेले, अद्ययावत सामग्री अन आल्हाददायक वातावरणात रुग्णसेवा
दलित चळवळीमधले ज्येष्ठ नेते, कवी, लेखक, कादंबरीकार नामदेव ढसाळ यांचा जन्मदिन जन्म.१५ फेब्रुवारी १९४९ नामदेव लक्ष्मण ढसाळ हे कवी, लेखक, कादंबरीकार आणि नाटककार अशा विविध पैलूंनी प्रसिद्ध असणारे दलित चळवळीमधले ज्येष्ठ नेते. मुंबईतल्या अत्यंत गरीब आणि बकाल भागात बालपण घालवल्याने त्यांनी दारिद्र्य आणि ससेहोलपट जवळून पाहिली आणि आपल्या विशिष्ट भाषेतून त्यांनी ते दलितांचं आयुष्य शब्दबद्ध केलं

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language